Breaking

केज मतदार संघातील पाच ग्रामपंचायतींना कार्यालयीन इमारत मंजूर

Updated: सप्टेंबर 30, 2025

By Vivek Sindhu

केज मतदार संघातील पाच ग्रामपंचायतींना कार्यालयीन इमारत मंजूर

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नमिता मुंदडा यांचे प्रयत्न; एक कोटी पाच लाखांच्या निधीची तरतूद

अंबाजोगाई : केज मतदार संघातील एकूण पाच २५ ग्रामपंचायतींना ‘मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने’ अंतर्गत कार्यालयीन इमारत उभारणीसाठी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. शासन निर्णय ३० सप्टेंबर २०२५ रोजी जाहीर झाला असून त्यानुसार या पाच ग्राम पंचायतींच्या इमारत उभारणीसाठी एक कोटी पाच लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या योजनेत केज मतदार संघातील ग्राम पंचायतींचा समावेश व्हावा यासाठी मिळाल्याचे आमदार नमिता मुंदडा यांनी सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयीन इमारती उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. शासनाच्या आदेशानुसार केज तालुक्यातील उंदरी (२५ लाख), डोका (२० लाख), पिंपळगव्हाण (२० लाख) व बावची (२० लाख) तर बीड तालुक्यातील कारेगव्हाण (२० लाख) ग्रामपंचायतींच्या इमारत उभारणीसाठी मंजुरी देण्यात आली आहे. एक वर्षाच्या मुदतीत बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

या निर्णयामुळे अंबाजोगाई, केज आणि बीड तालुक्यातील ग्रामपंचायतींना स्वतंत्र व सुसज्ज कार्यालयीन इमारती उपलब्ध होणार असून स्थानिक प्रशासन अधिक प्रभावीपणे कामकाज करू शकेल. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सुविधा अधिक सुलभ होणार आहेत. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.


Categories

Recent Posts