Breaking
Updated: सप्टेंबर 26, 2025
अंबाजोगाई येथील पोदार स्कुल येथे नवरात्री उत्सव जल्लोषात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई– पोदार प्रेप, अंबाजोगाई येथे नवरात्रीचा उत्सव पूर्व प्राथमिक विभागातील लहानग्यांनी आपल्या पालकांसह उत्साह व जल्लोषात साजरा केला.
शालांतर्गत उपक्रमात तीन दिवस विविध खेळ घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. ज्यात दांडिया सजवणे, गाणी व नृत्य यांसारख्या सर्जनशील उपक्रमांचा समावेश होता. तसेच विद्यार्थ्यांनी वारली चित्रकला करून ती मटक्याच्या आकारात साकारली, ज्यामुळे त्यांच्या कल्पकतेला व विचारशक्तीला चालना मिळाली.
विशेष आकर्षण ठरला शिक्षकांनी सादर केलेला भातुकलीचा खेळ. यातून विद्यार्थ्यांना “पुस्तक व पेन्सीलचा योग्य वापर” या विषयाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. मुलांनी या माध्यमातून योग्य पद्धतीने पुस्तक व पेन्सील वापरण्याचे वचन दिले. तसेच मुलांनी स्वतःचे पेन्सील टॉपर बनवून त्याच पेन्सिलींचे वाटप करण्यात आले.
तिसऱ्या दिवशी नवरात्रीतील सर्वांना आवडणारा दांडिया नृत्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहून्या म्हणून सौ.ज्योती जगताप मॅडम उपस्थित होत्या. मुली रंगीबेरंगी घागरा-चोलीत तर मुले आकर्षक कुर्ता-पायजाम्यात दांडियाच्या तालावर थिरकताना दिसली. या पारंपरिक वेशभूषेमुळे संपूर्ण शाळेचे वातावरण रंगतदार व उत्साही झाले. पालक व शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हा उपक्रम पोदार प्रेपच्या डायरेक्टर डॉ. स्वाती पोपट वत्स मॅडम यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने राबविला जातो. या कार्यक्रमासाठी शाळेचे प्राचार्य मा. श्री.किर्तीकुमार देशमुख सर व मुख्याध्यापिका सौ. मीनाक्षी राठोड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे व्यवस्थापकीय अधिकारी मा. श्री. प्रताप रसाळ सर व सर्व कर्मचारीवर्ग यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सीमा चौधरी व सौ. आरती चौघुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. स्नेहा भुसारे यांनी केले.
नवरात्रीचा हा उत्सव सर्वांच्या आनंद, उत्साह आणि सहभागाने अविस्मरणीय ठरला.