Breaking

रामकथेच्या श्रावणाने जीवनातील व्यथा दूर होते – रामायणाचार्य रामराव ढोक महाराज

Updated: सप्टेंबर 25, 2025

By Vivek Sindhu

श्री.योगेश्वरी देवीच्या मंदिरात रामकथेचे आयोजन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

श्री.योगेश्वरी देवीच्या मंदिरात रामकथेचे आयोजन

अंबाजोगाई -: रामकथेच्या श्रावणाने जीवनातील व्यथा दूर होतात. प्रत्येक प्रश्नांचे उत्तर राम कथेतून मिळते. असे प्रतिपादन रामायणाचार्य ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांनी केले .
येथील श्री.योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने २४ नोव्हेंबर
ते २९ नोव्हेंबर
सोमवार पर्यंत दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांच्या रामकथेस बुधवारी प्रारंभ झाला.
यावेळी उपस्थित भक्तांना संबोधित करताना ढोक महाराज म्हणाले की,आपल्या देशात एकही असा माणूस नाही.ज्याला रामायण माहित नाही. समाजात असलेली आदर्श जीवनमूल्ये रामायणाच्या माध्यमातूनच समाजात संक्रमित झाली आहेत. एक आदर्श राजनीती,जीवन पद्धती सांगणारा ग्रंथ म्हणून रामायणाकडे पाहिले जाते. पुढे बोलताना ढोक महाराज म्हणाले की देशात अखंडता टिकवायची असेल तर महाराष्ट्रात अखंडता पाहिजे. महाराष्ट्रातली ऐकी टिकविण्यासाठी आपल्या जिल्ह्यात ऐकी
पाहिजे. जिल्ह्यात एकी टिकविण्यासाठी तालुक्यात एकी पाहिजे. तालुक्यातील एकी टिकविण्यासाठी आधी गावात एकता पाहिजे.गावातली ऐकी टिकविण्यासाठी आधी आपल्या कुटुंबात एकता पाहिजे. कुटुंबातली ऐकी टिकवण्यासाठी बंधूंचं बंधूंवर प्रेम असल पाहिजे.ते प्रेम कसं असावं यासाठीच रामायण ऐकलं पाहिजे. असे अनेक संदर्भ देत त्यांनी उपस्थितांना रामायणातील अनेक प्रसंग सांगितले.
प्रारंभी रामायणाची पूजा देवल कमिटीच्या विश्वस्तांनी केली.महाआरती राजकिशोर मोदी यांनी केली.
ढोक महाराज यांचे स्वागत देवल कमिटीचे सचिव गिरधारीलाल भराडिया,उत्सव प्रमुख उल्हास पांडे, भगवानराव शिंदे,सौ.पूजा राम कुलकर्णी, सौ.गौरी जोशी, शिरीष पांडे,
श्रीराम देशपांडे यांनी केले.
रामकथा ऐकण्यासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती.


Categories

Recent Posts