Breaking
Updated: सप्टेंबर 24, 2025
अंबाजोगाईत तरुणावर रॉड व काठीने हल्ला, नाक फॅक्चर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: गणेश विसर्जनाच्या वादातून तरुणावर गावकऱ्यांनी रॉड व काठीने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८ वाजता अंबाजोगाईतील मुकुंदराज सभागृहाजवळ घडली.
फिर्यादी जयपाल अशोक माने (वय २६, व्यवसाय शेती, रा. मगरवाडी, ता. अंबाजोगाई) यांनी दिलेल्या जबाबानुसार, गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या वादामुळे गोपाळ जाधव, उमाजी मगर, ऋषीकेश काकडे, सिद्धेश्वर साठे आदींनी त्याला धमक्या दिल्या होत्या.
१९ सप्टेंबर रोजी रात्री अंबाजोगाई बसस्थानकाजवळ मुकुंदराज सभागृहासमोर तो थांबलेला असताना पांडुरंग जाधव याने लोखंडी रॉडने पाठीवर, पायावर व डोक्यात मारहाण केली. विठ्ठल तुकाराम जाधव व उमाजी जगन्नाथ मगर यांनी त्याला धरून ठेवले. त्याचवेळी ऋषीकेश काकडे याने काठीने डोक्यात व नाकावर मारहाण करून नाकाचे फ्रॅक्चर केले. इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जयपाल माने यांना आई रुपावंती व बहिणींनी घटनास्थळावरून सोडवून अॅम्बुलन्सने अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. हल्ल्यादरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट गळून हरवले असल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले.
या प्रकरणी अंबाजोगाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे