Breaking
Updated: सप्टेंबर 24, 2025
अंबाजोगाईत धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार; उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड मधील 28 तारखेच्या ओबीसी मोर्चाला अंबाजोगाईतून धनगर समाज जाणार नाही
अंबाजोगाई (प्रतिनिधी)- धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल धनगर समाजाने अंबाजोगाई येथे आक्रमक पवित्रा घेतला आहे. समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरू असून, सरकारने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही समाजाने दिला आहे.
ओबीसी यांच्या बीडमधील मोर्चाला अंबाजोगाईतील धनगर समाजाचा पाठिंबा नाही दरम्यान, येत्या 28 तारखेला बीडमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली होणार्या मोर्चात सहभागी न होण्याचा निर्धार अंबाजोगाईतील सकल धनगर समाजाने केला आहे.
लक्ष्मण हाके हे ओबीसींचे नेते असले तरी, त्यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीला म्हणावा तसा पाठिंबा दिला नाही, अशी भावना समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्या मोर्चात सहभागी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. सकल धनगर समाजाच्या या निर्धाराने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.