बीड -काल दुपारी एक ते दोनच्या दरम्यान प्रकाश आंबेडकर नगर इमामपूर रोड बीड या ठिकाणी बालविवाह होणार असल्याची माहिती सामाजिक संस्था राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान बीड यांना मिळाली त्यानुसार पोलीस व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी बीड यांना सदरील बालविवाह होणार असल्याची माहिती दिली
पेठ बीड पोलीस, सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले त्या वेळी बाल विवाहाची तयारी झालेली होती डॉल्बी लावून परण्या निघालेला होता त्या ठिकाणी पेठ बीडचे एन. ए. माने, तत्वशिल कांबळे अधिकार मित्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड व पेठ बीड पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारी ठिकाणी उपस्थित होते मुलीचे व मुलाचे दोघांचेही व कमी होते
वयाची पडताळणी केल्यानंतर मुलीचे वय 14 वर्षे व मुलाचे वय सतरा वर्ष आहे असे निदर्शनास आले त्या दोघांचे आई-वडील व इतर नातेवाईक या सर्वांना बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 या कायद्याविषयी माहिती दिली मुलाचे व मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याविषयी मार्गदर्शन केले
सदरील बालविवाह थांबवण्यास सांगितले मुलाचे व मुलीचे आई-वडिलांनी बाल विवाह करणार नाहीत असे सांगितले सर्व नातेवाईक यांनी समजून सांगितले सदर मुलीला व मुलाला बालकल्याण समिती बीड यांच्यासमोर सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.