Breaking
Updated: May 30, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड – स्वा. सावरकर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४२ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सारिका क्षीरसागर यांनी आपले विचार मांडले. वीर सावरकर हे भारताचे एक महान स्वातंत्र्यसेनानी आणि देशभक्त होते.
ज्यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि काळ्या पाण्यासारखा कठोर, निर्दयी आणि अमानुष छळ सहन केला, तरीही त्यांनी आपली देशभक्ती आणि सेवा सोडली नाही. यासाठी बीडमध्ये स्वा. सावरकरांच्या विचारांना जनमानसात लोकप्रिय करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन डॉ. क्षीरसागर यांनी केले.
संस्था प्रशासकीय अधिकारी प्रा.चंद्रकांत मुळे यांनी सावरकरांच्या कार्याला व विचारांना पुढे नेण्यासाठी नियमित उपक्रम बविण्याचे मानस व्यक्त करुन त्यांना अभिवादन केले.
यावेळी अध्यक्षस्थानी संस्था प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे व डॉ.सारिका क्षीरसागर यांच्या हस्ते सावरकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी स्थानिक समन्वय समिती कार्यवाह डॉ अविनाश देशपांडे, शालेय समिती अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, प्राचार्य डॉ सुहास मोराळे, उपप्राचार्य डॉ.उत्तम साळवे, डॉ.लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, मुख्याध्यापक श्री विठ्ठल काळे, उपमुख्याध्यापक माधव जोशी, प्रा. देविदास नागरगोजे ,विभाग प्रमुख प्रा बाळासाहेब साळवे, सदस्य गजानन जगताप, विजेंद्र चौधरी, अजिंक्य पांडव, बालाजी पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर यांनी सावरकरांच्या दैदिप्यमान कार्याचा उल्लेख करत त्यांचे विचार प्रकट केले. उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ सुहास मोराळे यांनी मानले.