Breaking

स्त्री रुग्णालय अंबाजोगाईत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान

Updated: सप्टेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

स्त्री रुग्णालय अंबाजोगाईत ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : केंद्रीय आरोग्य मंत्रालय व राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार स्त्री रुग्णालय अंबाजोगाई व वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी स्त्री रुग्णालय लोखंडी सावरगाव येथे पार पडला.

अभियानाचे उद्घाटन डॉक्टर राजेश इंगोले (सचिव आयएमए, सदस्य एमएमसी) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत चव्हाण होते. यावेळी वृद्धत्व आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉ. सुनील जाधव, प्राचार्य नवनाथ सोनवणे, दोन्ही संस्थेतील विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका व कर्मचारी उपस्थित होते.

अभियानांतर्गत रुग्णांना पोषण आहाराचे महत्त्व, रक्तक्षय, कर्करोग, क्षयरोग, अस्थिरोग, एनसीडी तपासण्या, मानसिक आरोग्य व किशोरवयीन मुलींचे समुपदेशन, स्त्रीरोग निदान, गरोदर मातांची तपासणी आदी सेवा देण्यात आल्या. तसेच आभा कार्ड, आयुष्मान कार्ड नोंदणीसह रक्त, लघवी, एक्स-रे, सोनोग्राफी, ईसीजी यांसारख्या चाचण्यांचाही लाभ रुग्णांना मिळाला. या शिबिरात एकूण ४३५ लाभार्थींनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीतल मुंडे यांनी केले. सूत्रसंचालन भांगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत शिंदे यांनी केले. डॉक्टर चव्हाण व डॉ. इंगोले यांनी स्त्रियांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी समाजासाठी महिला सशक्तीकरणाची गरज स्पष्ट केली.


Categories

Recent Posts