Breaking

घटस्थापनेने श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

Updated: सप्टेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

घटस्थापनेने श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

घटस्थापनेनंतर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

अंबाजोगाई – महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवास सोमवारी व सकाळी १० वाजता घटस्थापना व महापूजेने प्रारंभ झाला. अप्पर जिल्हाधिकारी सौ. अश्विनी जिरगे(सोनवणे), श्री.हरिश्चंद्र सोनवणे यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली. महापूजेनंतर योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

२२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर

या कालावधीत श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव साजरा होत आहे. सोमवारी सकाळी मंदिरात घटस्थापना व महापुजेने महोत्सवास प्रारंभ झाला.अप्पर जिल्हाधिकारी सौ. अश्विनी जिरगे(सोनवणे),श्री. हरिश्चंद्र सोनवणे यांनी श्री योगेश्वरी देवीची विधीवत महापुजा केली

या महापुजेसाठी योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा,सचिव गिरधारीलाल भराडीया, सहसचिव कमलाकरराव चौसाळकर, कोषाध्यक्ष सौ.पूजा राम कुलकर्णी, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, विश्वस्त आ.नमिता मुंदडा,राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे,भगवानराव शिंदे,ॲड.शरद लोमटे,श्रीराम देशपांडे,विश्वस्त तथा मुख्य पुजारी सारंग पुजारी,सौ.गौरी जोशी, संजय भोसले, हंसराज देशमुख,शिरीष पांडे, प्रवीण दामा, राजन पुजारी

यांच्यासह पुरोहित, मानकरी व भाविक उपस्थित होते. यावेळी पुरोहितांच्या मंत्रोपच्चारात व विधीवत महापूजेनंतर महाआरती झाली. घटस्थापनेनंतर श्री योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महिला व भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी देवल कमिटीच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

स्वखर्चाने आमदारांनी करून दिली सिमेंटगच्ची:

श्री. योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी पाहणी करण्यासाठी आ.नमिता मुंदडा मंदिर परिसरात आल्या होत्या. यावेळी त्यांना मोकळ्या जागेवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निर्शनास आले. त्यांनी या परिसरात रात्रीतून सिमेंटची गच्ची तयार करून देत भक्तांची गैरसोय दूर केली.

विविध उपक्रमांची रेलचेल:

श्री योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने रविवारपासून मंदिर परिसरात कीर्तन, प्रवचन, भजन आदि उपक्रम सुरू झाले आहेत. या सर्व उपक्रमांना भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.

ढोक महाराजांची रामकथा:

श्री.योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने २४ नोव्हेंबर

बुधवार पासून ते २९ नोव्हेंबर

सोमवार पर्यंत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज हे रामकथा सांगणार आहेत. या रामकथेचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे, सचिव गिरधारीलाल भराडिया, उपाध्यक्ष अक्षय मुंदडा, उत्सव प्रमुख उल्हास पांडे, पूजा कुलकर्णी यांच्यासह सर्व विश्वस्तांनी केले आहे.


Categories

Recent Posts