Breaking

महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या!

Updated: सप्टेंबर 18, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाईत बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा

अंबाजोगाई : महाबोधी महाविहार, बोधगया (बिहार) येथील 1949 चा अँक्ट रद्द करून संपूर्ण विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा व येथील ब्राह्मणीय कर्मकांड थांबवावे, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा बीड पूर्वच्या वतीने सोमवारी अंबाजोगाईत भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या या मोर्चात अंबाजोगाई, परळी, माजलगाव तालुक्यातील हजारो बौद्ध बांधवांनी सहभाग घेतला. बसस्थानक, पंचायत समिती, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. मोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

यावेळी मुख्यमंत्री बिहार सरकार, मुख्यमंत्री मध्यप्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांना उद्देशून उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात 1949 चा महाबोधी अँक्ट तात्काळ रद्द करून विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावा, तसेच ब्राह्मणीय कर्मकांड थांबवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली.

मोर्चात विविध समाज घटक, महिला व युवकांचा मोठा सहभाग होता. संपूर्ण मोर्चा शांततेत पार पडला असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


Categories

Recent Posts