Breaking

धनादेश न वाटल्याप्रकरणी आरोपीस एक वर्षाचा कारावास, 12 लाख 60 हजार रुपयांचा दंड

Updated: सप्टेंबर 18, 2025

By Vivek Sindhu

IMG 20250918 WA0019

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

फिर्यादीच्या वतीने ॲड. आर. एम. धायगुडे यांनी काम पाहिले

अंबाजोगाई : ऊस तोडीसाठी मजूर पुरवठ्याचा करार करून त्यापोटी घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस एक वर्ष साधा कारावास व तब्बल 12 लाख 60 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. फिर्यादीच्या वतीने प्रकरण लढवणारे ॲड. आर. एम. धायगुडे यांच्या कायदेशीर युक्तिवादाच्या जोरावर आरोपीस शिक्षा झाली.

प्रकरणातील फिर्यादी सुनील बापूराव साखरे यांनी संतोष शिवाजी शिंदे या आरोपीसोबत शंभर रुपयांच्या बॉण्डवर नोटरीसमक्ष 11 नोव्हेंबर 2019 रोजी करार केला होता. करारानुसार आठ लाख 40 हजार रुपये आरोपीकडे देण्यात आले. मात्र, आरोपीने ठरल्याप्रमाणे मजूर पुरवठा न करता रक्कमही परत दिली नाही. उलट फिर्यादीने परतफेडीची मागणी केल्यानंतर आरोपीने 8 लाख 40 हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र, त्या धनादेशावर स्वाक्षरी अपूर्ण असल्याचे कारण दाखवत बँकेने तो नाकारला. परिणामी फिर्यादी पुन्हा फसला.

याप्रकरणी फिर्यादीने प्रथम अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम 420 नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपीने न्यायालयात हजर होऊन जामीन घेतला. मात्र, केस पुराव्याच्या टप्प्यावर पोहोचल्यावर तो न्यायालयासमोर सतत गैरहजर राहिला. न्यायालयाने वॉरंट काढले, परंतु आरोपी मिळून आला नाही. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून न्यायालयाने आरोपीच्या गैरहजेरीतच खटला चालवला.

अतिरिक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मा. एस. बी. गणपा यांच्या न्यायालयाने 10 सप्टेंबर 2025 रोजी निकाल देताना आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाने त्याला एक वर्ष कारावास, 12 लाख 60 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. तसेच दंडातील संपूर्ण 12 लाख 60 हजार रुपये फिर्यादीस नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.

या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निकालात फिर्यादीच्या वतीने ॲड. आर. एम. धायगुडे यांनी बाजू मांडली. त्यांच्या सोबत ॲड. जी. डी. कांदे, ॲड. डी. ए. लोंढाळ, ॲड. अविनाश धायगुडे, ॲड. ओ. ए. लोंढाळ, ॲड. दयानंद गडदे व ॲड. पी. पी. धायगुडे यांनी सहकार्य केले.


Categories

Recent Posts