Breaking
Updated: सप्टेंबर 13, 2025
तिघे जेरबंद, २ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : शहरातील धनगरवाडा, गोविंद नगर परिसरात चालू असलेल्या जुगार अड्ड्यावर अंबाजोगाई शहर पोलिसांनी छापा टाकून तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून तब्बल २ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगरवाडा येथे काही इसम पत्यावर पैसे लावून ‘तिर्रट’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने पथकाने छापा घातला. या कारवाईत अन्वर हुसेन शहा (४०, रा. बागवान गल्ली, अंबाजोगाई), खंडू लिवांजी चौरे (४०, रा. बागवान गल्ली, अंबाजोगाई) व शेख वसीम शेख मन्नु (३८, रा. रविवारपेठ भोई गल्ली, अंबाजोगाई) यांना जुगार खेळताना पकडले.
त्यांच्याकडून तिर्रट जुगार साहित्य, ९ हजार ४०० रुपये रोख, मोबाईल फोन व मोटारसायकल असा मिळून अंदाजे २ लाख ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५५/२०२५, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात सपोनि घुगे, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, नाजिम शेख, मंगेश भोले, हनुमंत लाड, भागवत नागरगोजे यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस हवालदार अमोल गायकवाड करत आहेत.