Breaking
Updated: सप्टेंबर 11, 2025
मुस्लिम समाजाने प्राधान्यपूर्वक शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे-- राजकिशोर मोदी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुस्लिम समाजाने प्राधान्यपूर्वक शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे- राजकिशोर मोदी
अंबाजोगाई (प्रतिनिधी ) – अंबाजोगाई शहरात बुधवार दि 10 सप्टेंबर रोजी ईद मिल्लादुनबी साजरी करण्यात आली. त्या निमित्तने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंडीत अठराव्या वर्षी गवळीपुरा मित्रमंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 85 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आपले सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध केले. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून राजकिशोर मोदी तर कार्यक्रमाच्या अध्यस्थानी परळी येथील मुफ्ती अशफाक साहब हे होते. विशेष अतिथी म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, हाजी इस्माईल सेठ गवळी, डॉ राजेश इंगोले, पत्रकार दत्तात्रय आंबेकर मुजीब काजी सर हे होते.त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील सेठ वाघळकर, ऍड इस्माईल गवळी, मदार गवळी, महादेव आदमाने, धमपाल सरवदे, अंकुश हेडे, आकाश कराड उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना अंबाजोगाई चे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले की मोहंमद पैगम्बर यांनी दिलेल्या शिकवणी वर आमचे सहकारी जावेद भाई, मुक्तार भाई, खलील भाई, अमजत भाई हे चालत आहेत. रक्तदान सारखे सामाजिक काम ते सतत अठरा वर्षा पासून करत असल्या बद्दल त्यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. पुढे बोलताना त्यांनी मुस्लिम समाजात शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते मात्र तसे न होता समाजाने प्राधान्य क्रमाणे शिक्षणाला महत्त्व देण्याचे आवाहन याप्रसंगी सर्व सहकार्यांना केले. तर मुफ्ती अशफाक साहब यांनी मोहंमद पैगम्बर यांच्या बद्दल माहिती देऊन परळी अंबाजोगाईची ओळख सांगून जिल्ह्यात सामाजिक सलोखा सर्वांनी टिकवणे गरजेचे असल्याचे यावेळी नमूद केले.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी गवळीपुरा मित्रमंडळाचे ते राबवित असलेल्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. अशा प्रकारचा समाजोपयोगी कार्यक्रम आज ते सलग अठरा वर्ष पूर्ण करत असून हा उपक्रम सतत 50 ते 60 वर्ष चालावा अश्या शुभेच्छा त्यांनी दिल्या तसेच ऍड इस्माईल गवळी, मुजीब काजी सर, डॉ राजेश इंगोले, पत्रकार दत्तात्रय आंबेकर, महादेव आदमाने यांनी देखील आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी गवळीपुरा मित्रमंडळाच्या वतीने प्रथमच यावर्षी समाजसेवा पुरस्कार सुरु करण्यात आला हा पुरस्कार उपस्थित मान्यवराच्या हस्ते शेख मुक्तार चाचू यांना प्रदान करण्यात आला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे अध्यक्ष जावेद छोटू गवळी, खलील जाफरी,रहीम गवळी रमजान नोरंगाबादे, अमजद गवळी, महेबूब गवली, रमजान गवळी, कैलास कांबळे,अक्रम गवळी, शकेर काझी, सत्तार गवळी, अकबर पपुवाले, जावेद फुलारी, फेरोज रेघीवाले,हाजी जावेद गवळी, जमीलभाई पिजारी, शे हद्दी,जुम्मा गवळी,अक्रम अली अन्वर अली शे फेरोज शे मसूद, शे जलील अमजत अली,शे सलीम चौधरी,आदिनी परिश्रम घेतले . कार्यकमाचे प्रस्ताविक जावेद छोटू गवळी यांनी सूत्रसंचालन विजय राप्तवार सर तसेच आभार प्रदर्शन हुसेन लाला चौधरी यांनी केले.