Breaking

बीड जिल्हा पोलीस दलाचे कामकाज ‘ई-ऑफिस’द्वारे ऑनलाईन

Updated: सप्टेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

पेपरलेस युगाची सुरुवात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पेपरलेस युगाची सुरुवात

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्हा पोलीस दलाने तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कामकाजात क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. पारंपरिक कागदी पद्धतीला पूर्णविराम देत आता जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे सर्व प्रकारचे पत्रव्यवहार, प्रस्ताव, मंजुरी प्रक्रिया, कागदपत्रे आणि फाईल्स डिजिटल सही (DSC) द्वारे ऑनलाईन मार्गाने हाताळल्या जाणार आहेत.

पूर्वी प्रिंट काढणे, दस्तऐवज तयार करणे, सह्या घेणे आणि वरिष्ठांकडे पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष कर्मचारी लागायचा. त्यामुळे वेळ, श्रम आणि खर्च वाढत असे. मात्र ई-ऑफिसमुळे आता अधिकारी व अंमलदार कुठूनही ऑनलाईन फाईल पाहू शकतात, मंजुरी देऊ शकतात आणि पाठवू शकतात. त्यामुळे कामकाज गतीमान होऊन विलंब टळणार असून पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.

बीड जिल्हा पोलीस दल हा छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील असा उपक्रम हाती घेणारा पहिला जिल्हा ठरला आहे. महाराष्ट्रातही हा जिल्हा अग्रगण्य ठरण्याची अपेक्षा आहे. या माध्यमातून पोलीस प्रशासनात पेपरलेस ऑफिस या संकल्पनेला बळ मिळणार असून आधुनिकतेचा आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

या उपक्रमामागे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांचे मार्गदर्शन लाभले. आयटी सेलचे पो. अं. विलास चव्हाण, पो. उपनि. संदीप जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तांत्रिक कामकाज हाताळले. तसेच कार्यालयीन अधीक्षक नरसिंग कासेवाड यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले.


Categories

Recent Posts