Breaking

ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; अंबाजोगाई मध्ये मिरवणूक

Updated: सप्टेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; अंबाजोगाई मध्ये मिरवणूक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई-:ईद-ए-मिलादुबी निमित्त नुरानी मजीद येथून बुधवारी दुपारी वाजता जुलूस (मिरवणूक) काढण्यात आली. मिरवणुकीत मुस्लिम व हिंदू बांधवांनी उत्साहात सहभाग घेतला.
ईद-ए-मिलादुन्नबी ५ सप्टेंबर रोजी असल्याने व त्याच दिवशी गणेश विसर्जन मिरवणुका असल्याने प्रशासनावरील ताण लक्षात घेता, अंबाजोगाई शहरातील मुस्लिम बांधवांनी ही मिरवणूक बुधवार १० नोव्हेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शहरातील शांतता आणि सौहार्द कायम राहिले. ही मिरवणूक नुरानी मजीद येथून सुरू होऊन गवळीपुरायेथे समाप्त झाली. पोलिस प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे ही मिरवणूक शांततेत पार पडली. लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता.

विविध उपक्रमांचे आयोजन
ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त गवळीपुरा मित्र मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिर आणि गरजू व्यक्तींना मदत आदी उपक्रम आयोजित केले होते. ईद निमित्त आ.नमिता मुंदडा,राजकिशोर मोदी, पृथ्वीराज साठे,सरस्वती गणेश मंडळ, मोईन शेख मित्रमंडळ,व हिंदू बांधवांनी ठिकठिकाणी जुलूस चे स्वागत केले.व अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची सोय केली.


Categories

Recent Posts