Breaking
Updated: सप्टेंबर 10, 2025
ईद निमित्त निघालेल्या जुलूससाठी रोटरी क्लबने केली पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची सोय
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई -: सामाजिक सलोखा राखण्यासाठी अंबाजोगाईत बुधवारी ईद निमित्त निघालेल्या जुलूससाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची सोय करत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईद मिलादुन्नबी निमित्ताने दरवर्षी जुलूस निघतो. या माध्यमातून सामाजिक सलोखा वाढावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी तर्फे सर्व मुस्लिम बांधवांना पिण्याचे पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रोटरी क्लबच्या पदाधिकारी यांनी जुलूस मधील बांधवांचे स्वागत केले.व त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा.रोहिणी पाठक, उपाध्यक्ष धनराज सोळंकी, सचिव मंजुषा जोशी, प्रोजेक्ट डायरेक्टर राधेश्याम लोहिया,मोईन शेख,शेख शकील,कल्याण काळे,प्रा. संतोष मोहिते,डॉ.निशिकांत पाचेगावकर, प्रवीण चोखडा ,आनंद जाजू, डॉ अनिल केंद्रे ,स्वप्नील परदेशी , राजेंद्र घोडके,प्रदीप झरकर, रुपेश रामावत, डॉ नवनाथ घुगे,अजित देशमुख, बाळासाहेब कदम, रोटरी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.