Breaking

निष्काळजीपणा भोवला; हॉटेलबाहेरून चार लाखांची रोकड असलेली पिशवी लंपास

Updated: ऑगस्ट 30, 2025

By Vivek Sindhu

चोरट्यांनी चार लाख केले लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : तालुक्यातील मसाजोग येथे रस्त्यावरून चार लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे.

फिर्यादी करण शशिवाजी धुमक (वय २५, रा. घाटेवाडी, ता. केज) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी दुपारी ते आपल्या चुलत भावासोबत केज येथील एसबीआय बँकेत गेले. त्यांनी आपल्या खात्यातून चार लाख रुपये रोख काढले. ही रक्कम कपड्याच्या हिरव्या रंगाच्या पिशवीत ठेवून दोघे मोटरसायकलवरून परत गावी जात असताना, दुपारी ४.१५ वाजता मसाजोग चहा घेण्यासाठी थांबले. त्यांनी पिशवी मोटरसायकलच्या हँडलला अडकवून चहा घेतला. मात्र काही मिनिटांतच ती पिशवी गायब झाल्याचे लक्षात आले. आसपास शोध घेतला असता रोकड मिळाली नाही.

या घटनेनंतर करन धुमक यांनी केज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जावीद सिकंदर कराडकर करत आहेत.


Categories

Recent Posts