बीड : शहरातील कालीका नगर भागातील साई भगवान रेसिडेन्सी कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पंचावन्न हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी तानाजी जगनाथ लांडगे (रा. साई भगवान रेसिडेन्सी, कालीका नगर, बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 24 ऑगस्टच्या रात्री दहा वाजल्यापासून 25 ऑगस्टच्या सकाळी सहा वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून बेडरुममधील कपाटातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये तेरा तोळ्यांच्या दोन चांदीच्या जोड्या, दोन तोळ्यांच्या बांगड्या, दोन तोळ्यांची कंबरेची साखळी, चार ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मण्यांचे हार, दोन ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख सव्वीस हजार पाचशे रुपये असा एकूण पंचावन्न हजार तीनशे रुपयांचा ऐवज आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धोत्रे करीत आहेत.