अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मोहन नगर परिसरात केलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर अवैध परदेशी दारू जप्त केली असून समाधान महादेव नागरगोजे (वय 25) याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई गुरुवारी (21 ऑगस्ट) सायं. 5.30 वाजता करण्यात आली. पोलिसांनी नागरगोजेच्या ताब्यातून 105 बाटल्या रॉयल स्टॅग व 48 बाटल्या मॅकडॉवेल असा एकूण ₹18,180 किमतीचा परदेशी दारू साठा जप्त केला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, राजेंद्र घुगे, दत्तात्रय इंगळे, पिराजी गुट्टे, हनुमान चादर, भागवत नागरगोजे, पांडुरंग काळे, प्रवीण गीते व सुशांत गायकवाड यांचा सहभाग होता.
पोलिसांचे आवाहन दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असून अवैध धंद्याची माहिती तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावी असे आवाहन अंबाजोगाई शहर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.