Breaking

विद्युत मोटारचा करंट लागल्याने बाप-लेकाचा मृत्यु

विद्युत मोटारचा करंट लागल्याने बाप-लेकाचा मृत्यु

WhatsApp Group

Join Now

गेवराई – तालुक्यातील मारफळा येथील शेतकरी अभिमान लक्ष्मण कबले व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर अभिमान कबले या बाप लेकाचा विद्युत मोटारचा करंट लागल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (दि.२७) मंगळवार रोजी सकाळी सात वाजता घडली.

गेवराई तालुक्यातील मारफळा येथील शेतकरी अभिमान लक्ष्मण कबले हे आपल्या गावा जवळील शेतात मोटर चालू करण्यासाठी नेहमी प्रमाणे गेले होते. मोटरमध्ये करंट उतरल्याने अभिमान लक्ष्मण कबले, (वय ५०) हे चिटकले, त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर अभिमान कबले (वय २२) हा गेला.

परंतु त्याला विजेचा धक्का बसल्याने दोघा बाप-लेकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (दि.२७) मंगळवार रोजी सकाळी सात वाजता घडली. बाप-लेकाचे शवविच्छेदन बीड जिल्हा रुग्णानयात करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने मारफळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Last Updated: May 27, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.