मुंबईः महाराष्ट्रासह तीन राज्यांत हवामान विभागाने पावसाचा रेड अनर्ट जाहीर केला आहे. २७ मे पासून विशेषतः किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज मध्य महाराष्ट्रातील कोकण आणि घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्यात मान्सून २६ मे रोजीच पोहोचला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.