Breaking
Updated: July 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupनवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट जमा करण्यात येतात. यातील 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला होता. आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष 20 व्या हप्त्याच्या 2000 रुपयांकडे लागले आहे.
या योजनेच्या अधिकृत @pmkisanofficial या एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरुन शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही अनोळखी लिंक, फसवे कॉल किंवा मेसेजेसवर विश्वास ठेवू नये, असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. यासोबतच पीएम किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाईट www.pmkisan.gov.in आणि अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुनच अपडेट्स पाहावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.
शेतकरी बांधवांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही खोट्या माहितीकडे दुर्लक्ष करावं. केवळ अधिकृत संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडलवरुन मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवावा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये किंवा अनोळखी कॉल्सना प्रतिसाद देऊ नये.
पीएम किसान सन्मान निधीच्या हप्त्यांमध्ये सामान्यतः 4 महिन्यांचं अंतर असतं. मागील 19 वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये वितरित करण्यात आला होता. त्यामुळे पुढील 20 वा हप्ता जुलै-ऑगस्ट 2025 दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल.
या योजनेसोबतच महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांच्या माध्यमातून वर्षाला 12 हजार रुपये मिळतात. सध्या राज्यातील शेतकरी या योजनेच्या पुढच्या हप्त्याची देखील प्रतिक्षा करत आहेत.
पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याच्या रकमेचा लाभ देशभरातील 10 कोटी 4 लाख 67 हजार 693 शेतकऱ्यांना मिळाला होता. त्यापैकी महाराष्ट्रातील 93 लाख 25 हजार 774 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.
✅ केवळ www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरच विश्वास ठेवा.
✅ फसव्या कॉल्स, लिंक व मेसेजपासून सावध रहा.
✅ अधिकृत सोशल मीडियावर (@pmkisanofficial) अपडेट्स पहा.
शेतकरी बांधवांनी सावध राहून या योजनांचा लाभ योग्य वेळी घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.