Breaking
Updated: July 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupपोलिसांनी केली थेट तुरुंगात रवानगी; माजलगाव तालुक्यातील प्रकार
माजलगाव : आजकाल वाढदिवस साजरा करताना लोक वेगवेगळे हटके प्रकार करतात, मात्र माजलगाव तालुक्यातील उमरी गावातील अनिल शिंदे या तरुणाने वाढदिवसाच्या दिवशी थेट ‘तलवारीने’ केक कापून हटकेपणा दाखवायचा प्रयत्न केला आणि त्याला थेट पोलीस स्टेशनची वारी घडली.
दि. १५ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास उमरी येथे अनिल शिंदे याचा वाढदिवस त्याच्या मित्रांसह धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. डीजेच्या गोंगाटात नाच-गाणी झाली आणि नंतर गावातील दबदबा दाखवण्यासाठी थेट ‘तलवारी’ बाहेर काढत तीन तलवारीने केक कापण्यात आला. या विचित्र प्रकाराचे फोटो त्याच्या भावाने, सुनिल शिंदे याने फेसबुकवर शेअर केले.
Also Read: महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती
सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होताच दिंद्रुड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने चौकशी केली असता हा प्रकार उमरी येथे घडल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिसांनी अनिल शिंदे (३४), महादेव शिंदे (२२), विशाल गवळी (रा. पिंपळगाव नाखला), दादा म्हस्के (रा. पात्रुड) या चौघांवर शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तलवारी जप्त, वाढदिवसाचा हटकेपणा थेट ‘तुरुंगात’ संपला!
पोलिसांनी या घटनेत वापरलेल्या तीन तलवारी ताब्यात घेतल्या असून, या प्रकाराचा उद्देश ‘दहशत निर्माण करण्याचा’ होता, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोउपनि संजय राठोड, सफौ नंदकुमार वाघमारे, पो.ह. युवराज श्रीडोळे आणि पो.शि. कैलास पोटे यांनी सहभाग घेतला.
Also Read: देवळा खून प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, उपविभागीय अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शहरात किंवा गावात वाढदिवस साजरा करताना ‘शस्त्रं’ दाखवून दबदबा निर्माण करण्याचा हा प्रकार आता सर्रास होताना दिसतोय. मात्र, पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून अशा ‘फेसबुक स्टाईल दहशती’ला चाप लावण्याचा प्रयत्न केला आहे