Breaking

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर वारंवार अत्याचार

Updated: June 10, 2025

By Vivek Sindhu

लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर वारंवार अत्याचार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

बीडच्या माजलगाव शहर‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

माजलगाव – लग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार‎ करण्यात आल्याची घटना माजलगाव शहरात ‎घडली. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार समोर‎ आला. या प्रकरणी तरुणाविरोधात माजलगाव शहर‎ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.‎

माजलगाव शहरातील एका भागातील 17 वर्षीय‎ मुलीला सुनील विक्रम अलझेंडे (30, रा.‎माजलगाव) या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून ‎प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सप्टेंबर 2024 पासून त्याने ‎वारंवार तिच्यावर बलात्कार केला.‎यातून पीडिता गर्भवती राहिली. तिच्या पोटात दुखू‎ लागल्याने कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखवले असता,‎ मुलगी साडेपाच महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर ‎आले. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

या प्रकरणी ‎मुलीच्या तक्रारीवरुन सुनील अलझेंडे विरोधात ‎माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. पुढील तपास माजलगाव‎ पोलिस करीत आहे.‎आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर अनेकदा जबरदस्ती केली, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

बीडमध्ये 5 लाखांसाठी विवाहितेचा छळ

चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरहून पाच‎ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत विवाहितेचा छळ ‎करण्यात आल्याचा प्रकार पाटोदा तालुक्यातील ‎बेलेवाडी येथे घडला. या प्रकरणी सासरच्या चार‎ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.‎ काजल दीपक मळेकर (23) यांनी याबाबत तक्रार‎ दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, 5 लाखांसाठी त्यांचा‎ शारीरिक व मानसिक छळ केला गेला.

या प्रकरणी‎ दीपक सुदाम मळेकर, सुदाम बाबू मळेकर (दोघे रा.‎बेलवाडी, ता. पाटोदा), वैशाली बाबू तांबे (रा.‎नफरवाडी, ता. पाटोदा), सोनाली दादा बेद्रे (रा. सुपा,‎जि. पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.‎