Breaking

प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेला जामीन, मराठा समाज आक्रमक

Updated: July 17, 2025

By Vivek Sindhu

Deepak Kate

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

सोलापूर / अक्कलकोट :
अक्कलकोटमध्ये काही दिवसांपूर्वी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक काटे याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

या घटनेनंतर मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांनी अक्कलकोट पोलीस आणि भाजप नेत्यांवर पक्षपाती वागणुकीचे आरोप केले आहेत. अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

८ आरोपी अजून फरार, मोक्काच्या कारवाईची मागणी
या प्रकरणातील आणखी ८ आरोपी अजूनही फरार असून त्यांच्यावर मोक्का लावण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हेगारांना वाचवले जात असल्याचा आरोपही मराठा समाजाने केला आहे.

१८ जुलै रोजी अक्कलकोट बंद
या घटनेच्या निषेधार्थ १८ जुलै रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घटनेचा मागोवा:
१३ जुलै रोजी प्रवीण गायकवाड अक्कलकोटला एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांच्यावर काळं फासण्यात आलं. यामागे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी दीपक काटे असल्याचे उघड झाले. त्याच्या सोशल मीडियावरही भाजपशी संबंधित माहिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.