Breaking
Updated: July 17, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकिल्लेधारूर – तालुक्यातील गावंदरा येथे बुधवार (दि.१६) रोजी अज्ञात जंगली प्राण्याच्या हल्य्यात नऊ शेळ्या ठार झाल्या आहेत.या घटनेची माहिती मिळताच वन विभाग व पक्षुवैदयकिय कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला असून सदर घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
धारूर तालुक्यातील गावंदरा येथे बुधवार (दि.१६) रोजी अज्ञात जंगली प्राण्यांनी तब्बल लहान-मोठ्या अश्या नऊ शेळ्या मृत झाल्या असून त्या ठिकाणी वन विभागाचे कर्मचारी व पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी यांनी येऊन पंचनामा केला आहे हा.
हल्ला अद्याप कुठल्या जंगली प्राण्याने केला हे समजू शकलेले नाही.लांडगा की बिबट्या या़ची चर्चा असून सबंधित शेतकरी दत्ता संभाजी बडे या शेतकऱ्याच्या तब्बल आठ ते नऊ शेळ्या ठार झाल्या असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
त्यांना वन विभागाने तात्काळ या नुकसानीची मदत द्यावी व या जंगली प्राण्याचा बंदोबस्त करावा आशी मागणी होत आहे. या परीसरातील शेतकऱ्यांन मध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.