Breaking

शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाउंडेशन कडून मुंडेवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Updated: July 17, 2025

By Vivek Sindhu

फाउंडेशनच्या बीड विभागाचा आदर्श आणि स्तुत्य उपक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

फाउंडेशनच्या बीड विभागाचा आदर्श आणि स्तुत्य उपक्रम

केज – शिव विचारातुन शिव कार्याकडे, हे ब्रीद वाक्य घेऊन शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाउंडेशन महाराष्ट्र च्या वतीने सातत्याने सामाजिक आणि समाजाभीमुख उपक्रम आयोजित केले जातात.. फाउंडेशनच्या बीड विभागाच्या वतीने बुधवारी (दि.१६) केज तालुक्यातील मुंडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, ऊसतोड कामगार आणि वंचीत-उपेक्षीत घटकातील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिवविचार युवा रणरागीणी फाउंडेशनचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अलीकडच्या काळात शासन आणि प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा वाऱ्यावर सोडल्या असल्या तरी शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाउंडेशन महाराष्ट्र सारखे फाऊंडेशन सातत्याने शाळा आणि विद्यार्थ्यांना मदत करत आहेत . शिवविचार युवा रणरागीणी फाउंडेशनच्या बीड शाखेच्या वतीने मुंडेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तुषारदादा पाटील, उपाध्यक्ष संजयदादा राणे, सचिव प्रा. मनोज मुळे, खजिनदार वैभवभाऊ कापडणे, बीड विभागप्रमुख प्रभुकांत आश्रुबा सोन्ने तसेच मुख्याध्यापक विठ्ठल पुरी सर, प्रभूकांत सोन्ने सर, सुनिल तोगे सर यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. शिवविचार युवा रणरागिणी निर्माण फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.