Breaking

अंबाजोगाईत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात

Updated: July 17, 2025

By Vivek Sindhu

ग्रंथ दिंडी व संत सावतामाळी पालखी भव्य मिरवणूकीने लक्ष वेधले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

ग्रंथ दिंडी व संत सावतामाळी पालखी भव्य मिरवणूकीने लक्ष वेधले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त अंबाजोगाईत दिनांक १६ ते २२ जुलै दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी ग्रंथ दिंडी व संत सावतामाळी पालखी भव्य सवाद्य मिरवणूक, आतिषबाजी, भाविक भक्तांच्या जयघोषात सप्ताहास सुरूवात झाली.

प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहरातील संत सावतामाळी मंदिर, आद्यकवी मुकुंदराज रोड, अंबाजोगाई (जि.बीड.) या ठिकाणी आयोजित श्री संत सावता महाराज महात्म्य कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ बुधवार, दिनांक १६ जुलै रोजी सकाळी साडे आठ वाजता जिरे गल्ली येथून ग्रंथ दिंडीने झाला, सवाद्य मिरवणूक, आकर्षक पालखी सजवून, भगव्या पताका खांद्यावर घेऊन, टाळ-मृदंग-वीणा घेऊन विठोबा- रखुमाई, ज्ञानदेव-तुकाराम नामाचा गजर करीत लहान मुले व मुली विठ्ठल-रखुमाई, विविध संत यांची वेशभूषा करून तर महिला भगिनी यांनी कलश सजवून, तुळशी वृंदावन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी घेऊन या मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक, युवक हिरीरीने सहभागी झाले होते. त्यानंतर सकाळी आकरा वाजता कलश पूजन व टाळ-वीणा-मृदंग पूजन हस्ते ह.भ.प.किसन महाराज पवार, ह.भ.प.गुरूवर्य प्रेममुर्ती अरूण महाराज बर्दापूरकर, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, कल्याण आखाडे, आनंद शंकरराव शिंदे, ह.भ.प.अरूण महाराज शिनगारे, ह.भ.प.अमोल महाराज घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.महेश महाराज येरोळकर, मूंदगाचार्य ह.भ.प.गणेश आढाव, ह.भ.प.ऋषि महाराज मोरवडकर, ह.भ.प.दिपक महाराज कोरडे, गायनाचार्य ह.भ.प.महेश महाराज येरोळकर, भजनी मंडळ : श्री मुकुंदराज गुरूकुलचे सर्व विद्यार्थी (मुकुंदराज स्वामी मंदिर,अंबाजोगाई) हे होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, कल्याण आखाडे, ह.भ.प.अरूण महाराज शिनगारे, ह.भ.प.किसन महाराज पवार यांनी ही आपले समायोचित विचार व्यक्त केले. तर सुत्रसंचालन राम घोडके यांनी केले. या सप्ताहाची सांगता बुधवार, दि.२३ जुलै रोजी ह.भ.प.गुरूवर्य प्रेममुर्ती अरूण महाराज बर्दापूरकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत होवून त्यानंतर महाप्रसाद होईल. सप्ताहाचे आयोजनासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष अंकुश घोडके, उपाध्यक्ष सुरेश बलुतकर, अनंत अरसुडे, सचिव अर्जुन वाघमारे, सहसचिव भागवत मसने, कोषाध्यक्ष संतोष राऊत, राम घोडके, सदस्य सर्वश्री बळीराम चोपणे, प्रकाश बलुतकर, लक्ष्मण पाथरकर, मधुकर जिरे, नामदेव माळी, दत्तात्रय घोडके, रमेश जिरे, बबन घोडके, दशरथ जिरे, बालासाहेब मसने, अशोक बलुतकर, बालासाहेब माळी, प्रदीप जिरे, विष्णु राऊत, सुभाष चोपणे, डॉ.सुरेश अरसुडे, डॉ.दिपक फुटाणे, बालासाहेब चोपणे, विठ्ठल शिंदे, रमेश घोडके, सिद्राम घोडके, मधुकर घोडके, अशोक जिरे, तुषार करपुडे, बालासाहेब घोडके, संतोष जिरे, गोविंद पाथरकर, पवन जिरे, योगेश डाके, महेश सपाटे, आशिष आढाव, अभिजीत जिरे, शरद माळी, तुकाराम माळी, मंगेश बलुतकर, नितीन जिरे, दिपक गिरे, बबनराव जाधव, पंकज राऊत यांनी तसेच संयोजक, समस्त माळी समाज अंबाजोगाई यांनी पुढाकार घेतला आहे.