Breaking

सहा मोटार सायकलसह आरोपी जेरबंद

सहा मोटार सायकलसह आरोपी जेरबंद

WhatsApp Group

Join Now

बीड – मोटार सायकल चोरणार्‍या अट्टल चोराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने परळी रोड बार्शी नाका या भागातून सापळा लावून पकडले. या कारवाईत अनेक ठिकाणी मोटार सायकली चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या असून तीन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेने जिवन रामदास गाडे, वय 24 वर्ष, रा बार्शी नाका,बीड यास चोरीची दुचाकीसह पोलीसांनी परळी रोड येथे सापळा लावुन पकडले. जीवन गाडे हा आरोपी
पूर्वीपासून पोलीस रेकॉर्डवर होता .आरोपी जिवन रामदास गाडे यास ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने ईतरही बीड शहरातील व पुण्यामधील मौटार सायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडुन एकुण सहा मोटार सायकली जप् करण्यात येवुन 3 लाख 50 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे मोटार सायकलच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी जिवन रामदास गाडे याच्या कडुन खालील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
1. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 321/2025 कलम 303(2) बी.एन.एस 2. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 103/ 2023 कलम 379 भा.दं.विधान 3. पोलीस
ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 199/2023 कलम 379 भा.दं.विधान 4. पोलीस ठाणे चंदननगर, पुणे शहर गु.र.नं 255/2024 कलम 379 भा.दं.विधान 5. पोलीस ठाणे भोसरी गु.र.नं 1037/2023 कलम 379 भा.दं.विधान वरील पाच मोटार सायकलचे गुन्हे आरोपी नामे जिवन ामदास गाडे
याने केल्याची कबुली दिली आहे. तसेच ईतर एक मोटार सायकल बाबत कोणताही अभिलेख मिळुन आला नाही. त्या बाबत पोलीस तपास करीत आहे. सदरचा जिवन रामदास गाडे
हा यापुर्वी वडवणी पेालीस ठाणे यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयात अटक केली होती. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, पोलीस हवालदार विकास राठोड, राहुल शिंदे, मनोज परजणे, आशपाक सय्य्द, सुनील राठोड यांनी केली आहे.

Last Updated: July 4, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.