Breaking
WhatsApp Group
Join Now
अंबाजोगाई – अंकुर प्रतिष्ठान व संशोधन संस्था यांच्या वतीने आयोजित मोफत रोग निदान शिबीरात रुग्णांची तपासणी करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ धाट,प्रा. अशोक पत्की, समन्वयक सुधीर धर्माधिकारी, माणिकराव बावणे,माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख,डॉ.अतुल देशपांडे,डॉ.कौस्तुभ कुलकर्णी,डॉ.ओंकार ताथोडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ.अतुल देशपांडे म्हणाले की,मोफत शिबिरामुळे गरजु रूग्णांना फायदा होतो.अंकुर प्रतिष्ठानने यापुढे ही उपक्रम करावा असे आवाहन केले.पुढील मासिक मोफत रोगनिदान शिबिरात मुंबईचे सुप्रसिद्ध सर्जन पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने उपस्थित राहतील शिबीरासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राजेसाहेब देशमुख यांनी दिले व सेवानिवृत्त प्राचार्य राजाभाऊ धाट यांच्या मुळेच मी घडल्याचे त्यांनी सांगितले.संस्थेचे विश्वस्त सेवानिवृत्त प्राचार्य अशोक पत्की यांनी राजेसाहेब देशमुख यांचा व माणिकराव बावणे यांचा संस्थेचे समन्वयक सुधीर धर्माधिकारी यांनी सत्कार केला. अशोक पत्की यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास अ.भा. पे.संघटनेचे संजय देशपांडे,अनंतराव देशपांडे,तालुकाध्यक्ष भास्कर देशपांडे,डॉ. दिलीप कुलकर्णी,महेश राडीकर,दुर्गप्रेमी मंडळाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी,ब्राह्मण संघटनेच्या (दक्षिण विभाग) उपाध्यक्षा आरती सोनेसांगवीकर, सविता देशमुख यांच्यासह ग्रामस्थ रूग्ण उपस्थित होते.
Last Updated: July 4, 2025