केज – कोर्टात केस मागे घेण्यासह तणनाशकाने पीक जळाल्यावरून दोन गटात कुऱ्हाड, कोयते, स्पिक्लरच्या लोखंडी पाईपने तुंबळ हाणामारी झाली असून या मारहाणीत पाच जखमी झाल्याची घटना डोका (ता. केज) येथे १ जुलै रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी केज पोलिसात नऊ जणांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.