मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राज्यभर पावसाची हजेरी लागत आहे .बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय . हवामान विभागाने आज पुण्यात घाटमाथ्यावर वादळी पावसाचा रेड अलर्ट दिला असून तळ कोकणासह किनारपट्टी भागात तीव्र अलर्ट दिले आहेत .
उत्तर महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यातही वादळी वार्यासह मुसळधार पावसाची शक्यता शक्यता आहे. पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये पुढील सहा ते सात दिवस मान्सून सक्रिय राहणार असून प्रचंड पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे .प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टीसह मुंबई मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे .मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय.
पुढील 4-5 दिवस कोकणात,मुंबई, ठाणेसह व मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, भिन्न तीव्रतेसह मुसळधार पावसाची शक्यता. विदर्भाच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. खचऊच्या अलर्ट पहा. कोकण किनारपट्टीत गेल्या काही तासांपासून पावसाचा जोर वाढला आहे .रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.
हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा आवाहन करण्यात आले . विदर्भात बहुतांश ठिकाणी दुपारी पावसाची जोरदार हजेरी होती .अकोला अमरावतीसह वाशिम मध्येही मुसळधार पाऊस झाला . मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आहे .काही ठिकाणी हलक्या सरी येऊन गेल्या. पुणे घाट परिसरात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून तळ कोकणासह किनारपट्टीच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचे ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.
मुंबई, पालघरमध्ये यलो अलर्ट देण्यात आलाय . नाशिक, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना ,परभणी, हिंगोली ,नांदेड,अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट आहे. सातारा कोल्हापूर व नाशिक घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला, 4 जुलै : सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड तसेच पुणे व सातारा घाट परिसरात येलो अलर्ट देण्यात आलाय .कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट आहे .तर विदर्भात गोंदिया व गडचिरोलीमध्ये येलो अलर्ट., 5 जुलै :रत्नागिरी, रायगड, तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर तसेच चंद्रपुरात ऑरेंज अलर्ट, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया येलो अलर्ट.