अंबाजोगाई (प्रतिनिधी) – रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुंबेफळच्या विद्यार्थ्यांना संगणक भेट म्हणून देण्यात आला.

‘मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ, पुन्हा नव्याने उगवता येते. जर मनगटात असेल सामर्थ्य.’ या उक्तीप्रमाणे आपला एक वर्षाचा कार्यकाल संपण्यासाठी अवघे दोन दिवस राहिलेले असताना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटीचे अध्यक्ष व सचिव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळच्या विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान मिळविण्यासाठी शुक्रवार, दिनांक २७ जुन रोजी संगणक भेट म्हणून दिले.