Breaking
WhatsApp Group
Join Nowशालेय विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभुषा दिंडी व विविध स्पर्धांचे आयोजन; रोख बक्षीस
अंबाजोगाई – अंबाजोगाई शहरात आज पाच पालख्यांचा भव्य अश्व रिंगण सोहळा आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभुषा दिंडी व विविध स्पर्धांचे आयोजन येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर करण्यात आले असून पांडुरंगाच्या भक्तांनी मोठ्या संख्येने हा भव्य अश्व रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी केले आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने वसुंधरा सेवा प्रतिष्ठान च्या वतीने गेली अनेक वर्षांपासून संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई पालखी सह इतर तीन पालखीचे आगमन होताच येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर या पाच पालख्यांचा भव्य अश्व रिंगण सोहळा व शालेय विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभुषा असलेल्या दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात येवून भव्य बक्षिसांचे वितरण करण्यात येत असते. यामुळे या अश्व रिंगण सोहळा व शालेय विद्यार्थ्यांसाठी वारकरी वेशभुषा असलेल्या दिंडी स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळत आहे.
यावर्षी २६ जुलै, गुरुवार रोजी शहरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई पालखी सह इतर तीन पालख्यांचे आयोजन शहरात होत असून या पालख्यांचे विधीवत पुजा करुन येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या मैदानावर भव्य अश्व रिंगण सोहळा पार पडणार आहे.
या निमित्ताने शहरातील ४ थी पर्यंत, ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १० वी गटातील विद्यार्थ्यांच्या वारकरी वेशभुषा दिंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील प्रत्येकी विजेता गटास प्रथम बक्षीस रोख रु. ३, १००/- , व्दितीय बक्षीस रोख रु. २,१००/- , तृतीय बक्षीस रोख रु. १,१००/- तर उत्तेजनार्थ बक्षीस रोख रु. ५०१/- अशी देण्यात येणार आहेत. या स्पर्धा दुपारी २ वाजता सुरू होणार असून स्पर्धा संपवून परिक्षकांचे निकाल हाती येताच विजयी संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ही बक्षीसे भव् रिंगण सोहळा सुरू करण्यापुर्वी वाटप करण्यात येणार आहेत. सदरील बक्षीसे वाटप झाल्यानंतर स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य अश्व रिंगण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व पालख्यांची विधीवत पुजा करुन भव्य अश्व रिंगण सोहळ्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
अंबाजोगाई शहरात पांडुरंगाच्या नामस्मरणात डोळ्यांचे पारणे फेडणा-या या भव्य अश्व रिंगण सोहळा व शालेय विद्यार्थ्यांच्या वारकरी वेशभुषा दिंडी स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष नंदकिशोर मुंदडा व वसुंधरा सेवा प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी केले आहे.
Last Updated: June 25, 2025