केज – पंचायत समिती कार्यालय केज च्या सभागृहात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा– 02 चे तालुका व जिल्हा स्तरावरचे बक्षीसवितरण गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना श्रीमती दिवाणे मॅडम यांनी तालुक्यातून व जिल्ह्यातून आलेल्या सातही शाळांचे ,डिजिटल धनादेश ,ट्रॉफी, सन्मानपत्र व पुस्तक देऊन अभिनंदन केले.
तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गुणात्मकता सुधारण्यास मदत होते . शासनाने राबवलेल्या विविध स्पर्धेमधून गुणात्मक दर्जा, भौतिक सुविधा ,विविध उपक्रम राबवले जात आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून विद्यार्थी सर्व गुणसंपन्न बनत आहेत . याचा आनंद होतो आहे प्रत्येक शाळेतून उपक्रम राबवले जाणे गरजेचे आहे. तसेच बक्षीस प्राप्त शाळांनी आपल्या जवळच्या इतर शाळांना वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी करून घेतल्यास इतर शाळांना देखील समृद्ध बनण्यास प्रोत्साहन मिळेल असे मत व्यक्त केले.
शाळांनी राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करावेत जेणेकरून इतर शाळांना ते पाहता येतील व राबवता येतील असे मत व्यक्त केले तसेच प्रत्येक शाळेतून वाचन चळवळ उभा राहावी म्हणून वैयक्तिक स्वतः ग्रंथालयास पुस्तक भेट दिले तसेच राज्यापर्यंत केज तालुक्यातील शाळा पोहोचाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून मी शाळांना भेटी देणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून गटसाधन कार्यालयाचे गटशिक्षण अधिकारी मा.लक्ष्मणजी बेडसकर साहेबांनी केज तालुक्यातील अनेक शाळांचा दर्जा उत्तम आहे या स्पर्धेत शाळांचे मूल्यांकन करणे सोपं नाही त्यात या तालुक्यातील शाळा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवते हे अभिमानास्पद आहे. आणखीन शाळांनी गुणवत्ता, भौतिक सुविधा, शासकीय योजना राबवून केज तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचवावा
असे मत व्यक्त करून बक्षीस प्राप्त शाळांचे अभिनंदन व कौतुक केले. जिथे शाळांचा दर्जा व गुणात्मकता आहे तेथे शाळांचा पट चांगलाच आहे असेही ते म्हणाले.
तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी दत्ता चाटे यांनीही प्रखड शब्दात आपले मनोगत व्यक्त करून केज बीटातील पाच शाळा स्पर्धेत पात्र ठरले आहेत याचा मला अभिमान आहे असेही गौरवोद्गार काढले.
तसेच ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळांचे तालुक्याचे समन्वय श्री सुनील केंद्रे सर यांनी कार्यक्रमाचे सविस्तर प्रस्ताविक केले.
यावेळी श्रीमती गीते मॅडम, सचिन हंगे सर सोनवणे सर कंचनवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेत राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा सिरसट मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अश्रूवा सोनवणे सर यांनी केले.
कार्यक्रमास केज तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,केंद्रीय मुख्याध्यापक व बक्षीस प्राप्त शाळांचे सर्व शिक्षण उपस्थित होते.