Breaking
WhatsApp Group
Join Nowधारूर : धारूर तालुक्यात रानडुक्करांच्या त्रासाला शेतकरी वैतागलेले असतानाच एक अंत्यत दु:खद घटना घडली आहे. धारूर तालुक्यातील रूई धारूर येथील शेतकरी प्रकाश गोविंदराव तिडके वय ५७ वर्षे यांचा रान डुक्करांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धारूर तालुक्यातील रुई धारूर येथील प्रतिष्ठित व सांप्रदायिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व प्रकाश गोविंदराव तिडके हे 22 जून रविवार रोजी सकाळी पाच वाजता आपल्या गावातील घरातून शेतात दुध आणायला मोटारसायकल वरून जात असताना गावाजवळील ओढ्याजवळ चार ते पाच डुक्करांच्या कळपाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
या हल्ल्यात ते रोडवर पडले त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ लातूर येथील सह्याद्री हॉस्पीटल येथे दाखल केले परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रानडुक्करांच्या हल्ल्याने एक निष्पाप शेतकऱ्यांचा नाहक जीव गेला यामुळे गावात व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Last Updated: June 23, 2025