Breaking
WhatsApp Group
Join Nowअंबाजोगाई (प्रतिनिधी) – सामाजिक कार्यकर्ते अक्षयभैय्या जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक २० जून रोजी जैन गल्ली येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराला युवकांसह महिलांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. एकूण ६० जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमात तरुणांचा विशेष सहभाग राहिला असून महिलांची उपस्थिती हे या शिबीराचे विशेष आकर्षण ठरले. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने आयोजित होत असलेल्या या उपक्रमाचे हे यंदाचे पाचवे वर्ष होते. रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी अक्षयभैय्या जाधव यांचा मित्रपरिवारही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
या वेळी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवून शिबीराला सहकार्य केले.
या समाजोपयोगी उपक्रमामुळे रक्तदानासंदर्भात जनजागृती होण्यासाठी मदत झाली असून अक्षयभैय्या जाधव आणि त्यांच्या टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Last Updated: June 21, 2025