Breaking

अंबाजोगाईत गजानन महाराजांच्या पालखीचे भक्तांनी केले जोरदार स्वागत

पालखीचे भक्तांनी केले जोरदार स्वागत

WhatsApp Group

Join Now

अंबाजोगाई – शेगाव येथून निघालेल्या संत गजानन महाराज पालखीचे आज दुपारी तीनच्या सुमारास आगम न झाले. दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नागरिकांनी पालखीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत करुन दर्शन घेतले. बासष्ट वर्षाची परंपरा असलेल्या गजानन महाराज पालखीचे शहराच्या सीमेवर भाविकांनी गर्दी करीत मोठ्या भक्ती भावाने स्वागत करुन मनोभावे दर्शन घेतले. गजानन महाराजांच्या भक्तांनी मुख्य रस्त्यावर ठिकठिकांनी रांगोळ्या काढल्या होत्या, तर योगेश्वरी महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर गजानन महाराज भक्त महिला मंडळाने साड्यांच्या पायघड्या घालून पालखी मार्गस्थ केली. अनेक ठिकाणी भक्तांनी स्वागत फलकही लावले होत.

प्रारंभी भगवानबाबा चौकात पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार विलास तरंगे, नायब तहसीलदार स्मिता बाहेती, तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी पालखीचे स्वागत करुन मनोभावे दर्शन घेतले. यावेळी शहरातील सर्व पक्षांच्या राजकीय नेते, कार्यकर्त्यांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर पालखी अण्णाभाऊ साठे चौक – खडकपूरा -देशपांडे गल्ली – भट्ट गल्ली – मंडी बाजार – योगेश्वरी देवी मंदिर -गुरुवार पेठ – शिवाजी चौक – मोंढा मार्गे दत्त मंदिर येथे मुक्कामासाठी आली. याठिकाणी विश्रांती व व्यापारी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रसादाचा लाभ घेवून पालखी योगेश्वरी मातेचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेवून मुक्कामासाठी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे प्रस्थान झाली.

विठू नामाचा गजर चालू होता . व्यापारी व नागरिकांनी वारकऱ्यांसाठी महाप्रसाद केला होता .या भागात यात्रेचे स्वरूप आले होते . भाविकांची मोठी गर्दी होती . प्रसादाचे व खेळण्यांची दुकाने उभारण्यात आली होती .
गजनान महाराजांची पालखी शहरातील मुख्य रस्त्यावर रुन जात असतांना शहरातील अनेक नागरीक, व्यापारी संघटना, वैयक्तिक प्रतिष्ठाने, मित्रांचे समुह, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आदींनी एकत्र येवून दिंडीतील सहभागी वारकऱ्यांना फराळ, चहा-पाणी यांची मोफत व्यवस्था केले. पालखी मार्गस्थ होणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा दुकाने थाटल्यामुळे जत्रेचे स्वरुप आले होते.

महसुल दिंडीचा सहभाग

यावर्षी प्रथमच जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार गजानन महाराज यांच्या दिंडी समवेत महसुली दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शासनाच्या वतीने सर्वसामान्य माणसांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विविध सोयी सवलती व सुविधांची माहिती नागरीकांचा व्हावी यासाठी या महसुल दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार विलास तरंगे यांनी सांगितले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, नायब तहसीलदार स्मिता बाहेती व महसूल विभागाच्या इतर अधिकारी कर्मचारी यांचा समावेश होता.

आरती व महाप्रसादाचे आयोजन
संत गजानन महाराजांच्या पालखीची सकाळी विधीवत महापुजा करण्यात येवून महानैवेद्य दाखवण्यात येईल. यानंतर संत गजानन महाराजांच्या भक्त रमेश कापसे परिवाराकडुन गेली अनेक वर्षांच्या प्रथेनुसार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून पालखीतील सहभागी वारकरी या महाप्रसादाचा लाभ घेवून पालखी कळंब कडे मार्गस्थ होणार आहे.

Last Updated: June 21, 2025

By Vivek Sindhu

About Author

विवेक सिंधु हे बीड जिल्ह्यातील सर्वात जलद आणी अग्रगण्य न्यूज पोर्टल आहे, जे तुम्हाला तुमच्या भागातील घडामोडींचे ताजे अपडेट्स देते. आम्ही बीड जिल्यातील सर्व महत्वाच्या घटनांचे, कार्यक्रमांचे, राजकीय घडामोडींचे व समाजघटकांशी निगडित बातम्यांचे वस्तुनिष्ठ व जलद अपडेट्स देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.