Breaking
Updated: July 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupग्राहकांच्या विश्वासार्हतेच्या बळावरच बँकेची यशस्वी कामगिरी – चेअरमन राजकिशोर मोदी
अंबाजोगाई (प्रतिनिधी):-अंबाजोगाई पिपल्स को-ऑप सहकारी बँकेने ग्राहकांना दर्जेदार बँकींग सेवा देत ६०० कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. नुकतेच बँकेच्या सर्वोत्तम एनपीए व्यवस्थापनामुळे शहरी सहकारी बँक गटात ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार २०२५’ ने ही गौरवविण्यात आले आहे. अंबाजोगाई पिपल्स बँकेने पारदर्शक, गतिमान कारभार व तत्पर सेवेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नेहमीच उत्तम टीमवर्क करून बँकेने सभासद, ठेविदार, ग्राहक आणि हितचिंतक यांची विश्वासार्हता कमावली असल्याचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह सहकारी बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले आहे की, चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेने ६०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या प्रगतीचा आलेख आजतागायत उंचावलेला असून नुकतेच २४ मे २०२५ रोजी बँकेच्या स्थापनेस २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सामाजिक बांधिलकीतून पिपल्स बँक आज बँकींग क्षेत्रात कार्यरत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात बँकेच्या मुख्य शाखा व दोन विस्तारीत शाखांसह एकूण १८ शाखा कार्यरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हे बँकेचे कार्यक्षेत्र आहे. बँकेच्या सर्व शाखा या संगणकीकृत आहेत. यूपीआय ही सुविधा देणारी अंबाजोगाई पीपल्स बँक ही शहरातील पहिली नागरी बँक ठरली आहे. बँकेकडे स्वतःचे अत्याधुनिक डाटा सेंटर आहे. तत्पर, विनम्र आणि दर्जेदार बँकींग सेवा ही बँकेची ओळख आहे.
बँकेस तीन नव्या शाखांना भारतीय रिझर्व बँकेकडून मंजूरी मिळाली आहे.यामध्ये मुरूड, (जि. लातूर) केज, (जि. बीड), निलंगा (जि. लातूर) येथे मंजुरी मिळालेल्या बँकेच्या शाखा कार्यन्वीत होनार आहेत. बँकेकडून नव्यानेच आधारबेस पेमेंट सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये लाडकी बहीन योजना, गॅस सबसीडी, पीएम किसान सन्मान योजना यासारख्या शासनाकडून मिळणा-या विविध योजनांमधून मिळणारी रक्कम ग्राहकांच्या खात्यात थेट जमा केली जाते.
बँकेच्या कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त ग्राहकांना रोख रक्कम बँकेत जमा करता यावी यासाठी बँकेने आपल्या अंबाजोगाई शहरात रक्कम भरणा व काढणे मशीनची सुविधा सुरू केली आहे. अंबाजोगाई शहरामध्ये अशा प्रकारची सुविधा देणारी आपली अंबाजोगाई पिपल्स को.ऑप. बँक ही पहिलीच नागरी बँक ठरली आहे.
३० जुन २०२५ अखेर बँकेची सभासद संख्या १२६८५एवढी असून बँकेकडे ६०३ कोटीच्या ठेवी आहेत. बँकेचे भागभांडवल १९ कोटी, तर स्वनिधी हा ४८ कोटी एवढा आहे. बँकेने तब्बल ३२५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करत ३३० कोटी रूपयांची गुंतवणूकही केली आहे. बँकेला ३१ मार्च २०२५ अखेर ४ कोटी ७२ लाख रुपयांचा नफा झाला आहे. बँकेने आपल्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध सामाजिक, विधायक आणि लोकोपयोगी उपक्रम राबविले होते हे उल्लेखनीय आहे. अंबाजोगाई पीपल्स बँकेने गरूडझेप घेत ६०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला आहे. पिपल्स बँक ही केंद्र सरकार, आरबीआय, सहकार खाते आणि बँकींगचे सर्व नियम पाळून समाजातील शेवटच्या घटकांपर्यत बँकींग सेवा सर्व सुविधासह उपलब्ध करून देत आहे. आर्थिक वर्षात आपला एनपीए शुन्य टक्के ठेवण्याचा किंवा कमीत-कमी राखण्यासाठी काटेकोरपणे काम करीत बँकेकडून एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केले जाते.
याच सर्वोत्तम व्यवस्थापनाची दखल घेत आशिया खंडातील सहकारी बँकिंगसाठी सर्वात मोठे व्यासपीठ असलेले भारत कॉपरेटीव्ह बँकिंग समितीच्या वतीने नुकतेच अंबाजोगाई पीपल्स बँकेला एनपीएचे सर्वोत्तम व्यवस्थापन करणारी शहरी सहकारी बँक या गटात ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले असल्याचे राजकिशोर मोदी यांनी यावेळी अभिमानाने सांगितले. पुढे बोलताना राजकिशोर मोदी यांनी नमूद केले की बँकेच्या सर्वच शाखांतून बँकेमार्फत ग्राहकांना इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एईपीएस, तसेच युपीआय सारख्या अद्ययावत सुविधा देखील पुरविण्यात येत आहेत. बँकींग विषयक सर्व आधुनिक सेवा, सुविधा, नवे तंत्रज्ञान, डिजिटल व्यवहार बँक सभासद आणि ग्राहकांना पुरविते. यापूर्वी ही बँकेस विविध सन्मान व पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ज्यामध्ये बँकिंग फ्रंटीयर्स यांचा “बेस्ट ब्रँच एक्सपानशन पुरस्कार”, अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांचा उत्कृष्ट बँक व्यवस्थापन व तंत्रज्ञान श्रेणीत ” बँको पुरस्कार” , पुणे जिल्हा बँक्स असोसिएशनचा “उत्कृष्ट एन पी ए व्यवस्थापन पुरस्कार” या पुरस्कारांचा समावेश आहे.
अंबाजोगाई पिपल्स बँकेच्या सर्वांगिण प्रगती आणि विकासात बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, संचालक वसंतराव चव्हाण, ऍड. विष्णुपंत सोळंके, पुरुषोत्तम चोकडा, सुरेश मोदी, ऍड. सुधाकर कराड, श्रीमती वनमाला रेड्डी, संकेत मोदी, शेख दगडू शेख दावल, सौ. स्नेहा सतिश हिवरेकर, सुधाकर विडेकर, प्रकाश लखेरा, हर्षवर्धन वडमारे, तज्ज्ञ संचालक सचिन बेंबडे, तज्ज्ञ संचालक सुनिल राजपुरोहित, मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय देशपांडे, बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक, बँकेचे सर्व अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारीवृंद व पिग्मी एजंट यांचे सातत्यपूर्ण सहकार्य व योगदान असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली. अंबाजोगाई पिपल्स बँकेने ६०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल बँकेचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
ग्राहकांच्या विश्वासार्हतेच्या बळावरच बँकेची यशस्वी कामगिरी- राजकिशोर मोदी
अंबाजोगाई पिपल्स बँकेने आपल्या ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.त्याच विश्वासार्हतेच्या बळावरच बँक यशस्वी कामगिरी करू शकल्याचे बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितले. बँक सातत्यपूर्ण कामगिरी करीत वेगाने प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. बँकेचे सर्व सन्माननीय सभासद, ठेविदार, खातेदार, ग्राहक, हितचिंतक यांच्या बँकींग गरजा पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. अंबाजोगाई पिपल्स बँकही ग्राहकांची आपली हक्काची व त्यांचे हित जपणारी ही बँक असून बँकेने ६०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला. तसेच एनपीएचे व्यवस्थापन सर्वोत्तम केल्याचा आपणा सर्वांनाच आंनद आहे. सर्वानी बँकेच्या अभिनव सेवांचा आणि सुविधांचा पूर्णपणे उपयोग करावा असे आवाहन करून यापुढील काळात ही अंबाजोगाई
पिपल्स बँक आपल्या सर्वाच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहील अशी ग्वाही देतो.
राजकिशोर मोदी
(अध्यक्ष, अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.)