Breaking
Updated: जानेवारी 24, 2026
एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपाटोदा: तालुक्यातील धसपिंपळगाव शिवारात असलेल्या एका सोलार प्लांटवर सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून आणि मारहाण करून सुमारे तीन लाख रुपये किमतीचे सहा किलोमीटर लांबीचे तांब्याचे केबल चोरून नेले आहे. या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र बाबासाहेब सदगर हे शिरूर कासार तालुक्यातील हाटकरवाडी येथील रहिवासी असून ते धसपिंपळगाव येथील सोलार प्लांटवर खाजगी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत. २३ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास राजेंद्र सदगर आणि त्यांचे सहकारी मल्हारी भंडगर हे कर्तव्यावर असताना हेमंत नाना काळे, राहुल मच्छिंद्र शिंदे, रमेश विलास पवार, दिलीप विलास पवार आणि इतर दोन अनोळखी इसम तेथे आले. या आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्याला कोयता व सुऱ्याचा धाक दाखवला. चोरट्यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आणि धाक दाखवून सोलार पॅनलचे अंदाजे ६ किलोमीटर लांबीचे डीसी तांब्याचे केबल जबरदस्तीने कापून चोरून नेले.
या घटनेनंतर राजेंद्र सदगर यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१०(२) आणि ३५१(३) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या घटनेत फिर्यादी राजेंद्र सदगर आणि मल्हारी भंडगर हे दोघेही जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.