Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

२६ आठवडे वय, ७५० ग्रॅम वजन आणि फुफ्फुसे कमजोर असलेल्या बाळाला अंबाजोगाई येथील लाड हॉस्पिटलने दिले जीवदान

Updated: फेब्रुवारी 24, 2026

By Vivek Sindhu

२६ आठवडे वय, ७५० ग्रॅम वजन आणि फुफ्फुसे कमजोर असलेल्या बाळाला अंबाजोगाई येथील लाड हॉस्पिटलने दिले जीवदान

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – जन्मावेळी कमी दिवस भरलेले, २६ आठवडे वय, वजन केवळ ७५० ग्रॅम एवढे, त्यात ही गंभीर बाब म्हणजे सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे जन्म झाला. फुफ्फुस कमजोर असल्यामुळे त्या बाळाला जन्मतःच तीव्र श्वसनाचा त्रास होऊ लागला.‌ यामुळे तातडीने या बाळाला डॉ.लाड हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.‌ गंभीर अवस्थेतील बाळावर डॉ.लाड यांच्या योग्य निदान आणि औषधोपचारामुळे लाड रूग्णालयात त्या बाळाला जीवदान मिळाले. आपले बाळ सुखरूप आहे. हे पाहून बाळाच्या पालकांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद झळकत होता.

याबाबत अधिक माहिती देताना लाड हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ.सायली लाड यांनी सांगितले की, जन्मावेळी कमी महिने भरलेले, २६ आठवडे वय, ७५० ग्रॅम एवढे वजन, त्यात ही गंभीर बाब म्हणजे फुफ्फुसे कमजोर असलेल्या व योगेश्वरी मॅटर्निटी होम येथे आईचे सिझेरियन ऑपरेशन झाल्यानंतर नवजात बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणून त्या बाळाला पुढील उपचारांसाठी अंबाजोगाईच्या लाड हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले. त्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्रथम व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या केल्यानंतर समजले की, त्या बाळाचे फुफ्फुस हे खुपच कमजोर आहे. नाड्या लागत नव्हत्या, त्यानंतर लाड हॉस्पिटलकडून आम्ही ही गंभीर बाब बाळाच्या पालकांना निदर्शनास आणून दिली. योग्य निदान केले. काय औषधोपचार करावे लागतात. याबाबत अधिक माहिती दिली. पुढील योग्य त्या उपचारासाठी पालकांनी संमती दर्शविली. उपचारापूर्वी पालकांची अनुमती घेऊन तातडीने बाळाच्या फुफ्फुसांमध्ये सफॅक्टंट हे इंजेक्शन देण्यात आले, शॉक विरोधात ट्रिटमेंट सुरू केली. तसेच बाळाच्या नाड्या (ब्लड प्रेशर) कमकुवत असल्याने तातडीने योग्य ते औषधोपचार करण्यात आले.‌ लाड हॉस्पिटलमधील‌ डॉक्टरांचे योग्य निदान व अथक प्रयत्नांमुळे बाळाची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर काही तासांतच बाळाच्या प्रकृती मध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. बाळाच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. हे लक्षात येताच बाळाला लावलेली मोठी मशीन काढण्यात आली. आणि छोटी मशीन लावण्यात आली. बाळाला हळूहळू ऑक्सिजनवर शिफ्ट करण्यात आले. त्यानंतर त्या बाळाला आईचे दूध देणे सुरू करण्यात आले. सुरूवातीला दूध न पचल्याने काही काळ दुध बंद करून पुन्हा जसं-जसे बाळाला दूध पचत होते. तस तसे दुधाची मात्रा वाढविण्यात आली. ज्यावेळेस बाळाला जेवढे दूध लागते. तेवढेच दूध ते घेत होते. पुढील काही दिवसांत योग्य व तत्पर उपचारांनंतर बाळाची प्रकृती सुधारली. व‌‌ त्यानंतर हे बाळ त्याच्या आईकडे शिफ्ट करण्यात आले. ज्यावेळेस बाळाचे वजन वाढले आहे. आणि बाळ आता स्थिर झाले आहे अशी डॉ.लाड यांची पूर्ण खात्री झाली आणि पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतरच त्या बाळाला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली. कमी वय आणि वजन, फुफ्फुसे कमजोर असणाऱ्या व अतिशय गंभीर अवस्थेत असलेल्या नवजात बाळाला लाड हाॅस्पिटल मध्ये एक प्रकारे नवे जीवदानच मिळाले. त्या‌ बाळाची प्रकृती पुर्णपणे सुधारून निरोगी अवस्थेत बाळाला लाड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे बाळाच्या पालकांनी लाड हॉस्पिटल मधील डॉ.लाड, डॉ.सायली लाड, डॉ‌.अखिलेश व सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळे सदरील बाळ ठणठणीत बरे झाले याबाबत समाधान व्यक्त करून योगेश्वरी मॅटर्निटी होम हॉस्पिटलचे डॉ.प्रल्हाद गुरव यांनी सुरूवातीपासूनच २६ आठवड्यांच्या या बाळाच्या उपचारासाठी मोलाची भूमिका बजावली व बाळाला नवसंजीवनी दिली म्हणून त्यांचे तसेच लाड हॉस्पिटलचे डॉ.लाड व योगेश्वरी मॅटर्निटी होम हॉस्पिटलचे डॉ.गुरव यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केले. यापूर्वी ही लाड हॉस्पिटल मध्ये अनेक बालकांवर योग्य औषधोपचार करण्यात आले आहेत. ज्यात अन्ननलिका पूर्ण विकसित झालेली नसणे, नाड्या कमजोर असणे, शरीरामध्ये जीवाणूचा संसर्ग झालेला असणे. कमजोर असलेल्या बाळांमध्ये ऑपरेशन करणे, जोखीम पत्करून योग्य निदान व औषधोपचार करणे, प्रसंगी बाळांचे सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करणे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, एक्स-रे, निष्णांत भुलतज्ज्ञ अशा विविध सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम डॉ.सायली लाड व त्यांच्या लाड हॉस्पिटल मधील स्टाफ हे अव्याहतपणे करतात. सर्वजण खूप मेहनत घेतात हे उल्लेखनीय आहे.


Categories

Recent Posts