Breaking
Updated: July 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupबीड – शहरातील पालवन चौक भागातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार (दि.१८) रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला.
आकाश हनुमंत गालफाडे (वय २५ वर्ष) रा. पालवन चौक, बीड असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याने आज शुक्रवार (दि.१८) रोजी सकाळी पाण्याच्या टाकीजवळ नर्सरी भागात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार स्थानिक नागरीकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. मात्र या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस अधिक तपास घेत आहेत.