Breaking
Updated: July 14, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupकेज – कागद वाचून सही करते, असे पत्नी म्हणाल्यावरून पतीने चापटाबुक्यांनी मारहाण करीत डोक्यात वीट मारून जखमी केल्याची घटना नांदूरघाट (ता. केज) येथे घडली. याप्रकरणी पतीविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
तेलगाव नाका, गांधीनगर (जि. बीड) येथील हिना अमीर अतार (वय ३०) या महिलेस एक मुलगा, एक मुलगी असून दोघा पती – पत्नीत सतत भांडण होत असल्याने मागील एक महिन्यापासून त्या माहेरी नांदूरघाट येथे आई वडिलांकडे राहत आहेत. १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्या एकट्याच असताना त्यांचा पती अमीर रशीद अतार याने येऊन सोबत आणलेल्या कागदावर सही मागितली. त्यावर त्या कागद वाचल्यावर सही करते, म्हणाल्या असता त्यांना शिवीगाळ व चापटाबुक्यांनी मारहाण करीत डोक्यात वीट मारून जखमी केले. चारित्र्यावर संशय घेत जीवे मारण्याची व स्वतःच्या जीवाचे बरेवाईट करून तुझ्या घरच्या लोकांची नावे घेतो, अशी धमकी दिली. अशी तक्रार हिना अतार यांनी दिल्यावरून अमीर अतार विरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार उमेश आघाव करीत आहेत.