Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात वॉटर कुलर चे लोकार्पण

अंबाजोगाई-:भारतीय जनता पक्षाचे युवानेते अक्षय मुंदडा यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.डॉ.विमलताई मुंदडा आरोग्य संकुल लोखंडीसावरगाव येथील स्त्री रुग्णालय व वृंधत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र येथे रुणांना थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी दोन वॉटर कुलर बसविण्यात आले.हा उपक्रम अक्षय मुंदडा मित्रमंडळाच्या वतीने राबविण्यात आला.

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.लोखंडी सावरगाव येथे भाजपा च्या कार्यकर्त्यांनी रुग्णांची गरज ओळखुन त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पूर्वीच बसविण्यात आलेल्या तांत्रीक जलकुंभास वॉटर कुलर बसविण्यात आले. कडक उन्हामुळे रुग्नास् तसेच कर्मचारी यांना गरम पाणी प्यावे असे.ती गैरसोय आता दूर झाली आहे.या लोकार्पण सोहळ्यास भाजपाचे जेष्ठनेते नंदकिशोर मुंदडा,अक्षय मुंदडा,माजी उपनगराध्यक्ष शेख रहीम,रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.चंद्रकांत चव्हाण,डॉ.अरुणा केंद्रे,भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,कमलाकर कोपले,दिलीप काळे, संजय गंभीरे,कल्याण काळे,डॉ.निशिकांत पाचेगावकर,नूर पटेल,मधुकर कांचगुंडे, शेख ताहेर, खलील मौलाना, बाला पाथरकर,हनुमंत तौर, सुरेश कऱ्हाड,महेश अंबाड,राहुल कापसे,दिग्विजय लोमटे,अनंत आरसूडे,प्रशांत अदनाक, गोपाळ मस्के,शरद इंगळे,बळीराम चोपणे,अप्पा कदम,श्रीपाद डांगे,मयूर रणखांब यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Friday 13th of May 2022 03:30 PM

Advertisement

Advertisement