Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

अंबाजोगाईतील संत कबीर नगरमध्ये कंटेनमेंट झोन घोषित

अंबाजोगाई :  अंबाजोगाई आज प्रथमच कोरोनाचा रुग्ण आढळून आला. अलिबागहून आलेल्या संत कबीर नगर भागातील ४० वर्षीय महिला कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे इतर ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी संत कबीर नगरमध्ये कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

             जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार संत कबीर नगर मधील कृष्णाबाई धारोबा बनसोडे यांचे घर ते नानासाहेब विठ्ठल कांबळे यांच्या घरापर्यंतच्या परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला असून अनिश्चित कालावधीसाठी हा परिसर पूर्णवेळ बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Monday 6th of July 2020 12:24 AM

Advertisement

Advertisement