Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

धारूर कोर्टातून तरुणाचे अपहरण; शहरात खळबळ

Updated: जानेवारी 31, 2026

By Vivek Sindhu

धारूर कोर्टातून तरुणाचे अपहरण; शहरात खळबळ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर: धारूर येथील न्यायालय परिसरातून एका तरुणाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना ३० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. भरदिवसा आणि कोर्टासारख्या सुरक्षित ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. पोलीस उपनिरीक्षक ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली असून, अपहरणकर्त्यांचा शोध घेतला जात आहे. ही घटना नेमक्या कोणत्या कारणातून घडली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.


Categories

Recent Posts