Breaking

शेतातील विद्युत तारेचा करंट लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; घाटनांदूर येथील घटना

Updated: June 13, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 06 13 at 3.28.25 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

अंबाजोगाई : तालुक्यातील घाटनांदूर गावात आज शुक्रवार, दि. १३ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास करंट लागून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणाचे नाव धनंजय राजाभाऊ जाधव (देशमुख) (वय २४) असून तो घाटनांदूर येथील रहिवासी होता. दररोजप्रमाणे तो सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता. यावेळी शेतामध्ये असलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे त्याला जोराचा विद्युत झटका बसला. यात तो जागीच कोसळला. त्यानंतर तातडीने त्याला स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

धनंजय हा अत्यंत शांत, हसतमुख आणि सर्वांशी मनमिळावून वागणारा युवक म्हणून ओळखला जात होता. तो आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वत्र या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.