Breaking

लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण

Updated: मार्च 9, 2026

By Vivek Sindhu

लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – शहरातील अंकुश नगर परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात संदीप दहिफळे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीड शहरातील अंकुश नगर भागात संदीप दहिफळे याला तीन ते चार जणांनी अडवून त्याच्यावर अचानक हल्ला केला.आरोपींनी धारदार शस्त्राने त्याच्या पाठीवर आणि छातीवर वार केले. त्यानंतर लोखंडी रॉडने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यात हाताच्या हाडाचे तीन तुकडे झाले असून हल्ल्यात त्याच्या छाती, पोट आणि हाताला गंभीर दुखापत झालीये.जखमी संदीप दहिफळे याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणात वैद्यकीय कायदेशीर नोंद (MLC) करण्यात आली असली तरी अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जखमी तरुणाच्या वडिलांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास सुरू आहे.


Categories

Recent Posts