Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

योगेश्वरी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी फुलवला श्रमदानातून रानमळा

Updated: डिसेंबर 11, 2025

By Vivek Sindhu

दररोजच्या आहारात सेंद्रिय, ताजी 'रानभाजी'

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दररोजच्या आहारात सेंद्रिय, ताजी ‘रानभाजी’

अंबाजोगाई – शैक्षणिक अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना कृषी संस्कृतीची आणि श्रमाच्या मूल्याची जाणीव व्हावी, या उदात्त हेतूने अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या योगेश्वरी विद्यार्थी वसतिगृहात एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी सामूहिक श्रमदान करत, पंधरा गुंठ्यांच्या जागेत विविध प्रकारचा भाजीपाला फुलवला आहे. यामुळे आता या विद्यार्थ्यांना रोजच्या जेवणात ताजी, आरोग्यदायी आणि सेंद्रिय भाजी उपलब्ध होत आहे.
योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांची ही संकल्पना होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वसतिगृहाच्या परिसरातील सुमारे १५ गुंठे मोकळ्या जागेचा उपयोग शेतीसाठी करण्यात आला. या उपक्रमात वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शिक्षणातून वेळ काढून सक्रिय सहभाग घेतला.वसतिगृहाचे रेक्टर तथा कला शिक्षक दत्ता बनसोडे, मेजर एस. पी.कुलकर्णी यांची याकामी यशस्वी भूमिका आहे.ते विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतात.
श्रमदानातून खड्डे खोदणे, बी-बियाणे पेरणी आणि रोपांची काळजी घेणे, अशी सर्व कामे स्वतःच्या श्रमातून पूर्ण केली.
या शेतीत वांगी, टोमॅटो, भेंडी, मिरची, शेवगा, कोथिंबीर, पालक, पानकोबी यांसारख्या फळभाज्यांसह विविध प्रकारच्या पालेभाज्यांची यशस्वीपणे लागवड करण्यात आली आहे.
जेवणाची चव वाढली
या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या भाजीपाला लागवडीसाठी कोणत्याही रासायनिक खताचा वापर करण्यात आलेला नाही. विद्यार्थ्यांच्या श्रमातून तयार झालेल्या या शेतीत केवळ सेंद्रिय खताचा वापर करण्यात आला आहे.
यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना आता बाजारातून आणलेल्या भाजीपाल्यावर अवलंबून न राहता, पूर्णतः ताजा, विषमुक्त आणि सेंद्रिय भाजीपाला दररोजच्या जेवणात उपलब्ध होत आहे. श्रमसंस्कार आणि आरोग्यदायी आहार, असा दुहेरी फायदा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळत आहे. संस्थेच्या या संकल्पनेचे परिसरातून कौतुक होत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार रुजत आहेत. महेश कुकडे, उमेश खोडके, रवी राठोड,अमोल पवार,लक्ष्मण ढगे,मुरली डोईफोडे,लक्ष्मण ढगे,सोहम जाधव, नवनाथ शेळके,लालसिंग जाधव,अथर्व जाधव ,रवी चव्हाण इत्यादी विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.


Categories

Recent Posts