Breaking
Updated: डिसेंबर 4, 2025
योगेश्वरी देवीच्या यात्रेलाही भाविकांची मोठी गर्दी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelयोगेश्वरी देवीच्या यात्रेलाही भाविकांची मोठी गर्दी
हजारो भाविकांनी घेतले योगेश्वरी देवीच्या पालखीचे दर्शन
अंबाजोगाई - महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची सांगता शुक्रवारी दुपारी एक वाजता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. तहसीलदार विलास तरंगे वत्यांच्या सौभाग्यवती तरंगे, यांच्या उपस्थितीत पुर्णाहुती व महापुजा झाली. महापुजेनंतर योगेश्वरी देवीच्या होमात श्रीफळ टाकण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली होती. महापुजेनंतर देवीच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या.
आज योगेश्वरी देवीच्या भरलेल्या यात्रेला मोठी गर्दी झाली होती. तसेच रात्री निघालेल्या योगेश्वरी देवीच्या पालखीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव २७ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत साजरा झाला. आज महोत्सवाची सांगता होमहवन व पुर्णाहुती महापूजेने झाली. यावेळी योगेश्वरी देवल कमिटीचे सचिव गिरधारीलाल भराडीया, विश्वस्त भगवानराव शिंदे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, विश्वस्त पृथ्वीराज साठे, राजकिशोर मोदी, कमलाकर चौसाळकर, अॅड. शरद लोमटे,उल्हास पांडे, अक्षय मुंदडा, श्रीराम देशपांडे, संजय भोसले, पूजा राम कुलकर्णी, शिरीष पांडे,
योगेश्वरी देवीचे मानकरी, पुरोहित,मानकरी उपस्थित होते.
या पुर्णाहुतीनंतर आराध बसलेल्या महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज योगेश्वरी देवीच्या यात्रेसाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली. अंबाजोगाई व पंचक्रोशीतील दर्शनासाठी भाविकांची मोठी संख्या मंदिर परिसरात झाल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाला मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवावा लागला. रात्री आठ वाजता योगेश्वरी देवीची पालखी मंदिरातून निघाली. ही पालखी मंडीबाजार, पाटील चौक, भट गल्ली, जैन गल्ली, गौंड गल्ली मार्गे देशपांडे गल्लीतील देवघर, कुत्तरविहिर मार्गे पुन्हा मंदिरात पोहचली. पालखी सोबत आराधी भजनीमंडळ, महिलांचे भजनी मंडळ, ढोलताशे, झांज पथक व शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेली विद्युत रोषणाई शहर वासियांचे लक्ष वेधणारी ठरली.